बहुजननामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड अभिनेता इरफान खानची प्रकृती खालावली असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्रा, प्रकृती खालावण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अभिनेता इरफानने कॅन्सरवर मात केली असून उपचारानंतर भारतात परतला आहे. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर 2019 मध्ये इरफान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला. मात्रा आता पुन्हा एकदा प्रकृतीच्या कारणास्तव त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
https://twitter.com/irrfank/status/974578690066669568
इरफान खानला कोकिलाबेन रुग्णालयातील आयसीयुत दाखल करण्यात आले आहे. अद्याप अभिनेत्याच्या कोणत्याही निकटवर्तीयांनी यासंबधी अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, इरफानची पत्नी आणि दोन्ही मुले रुग्णालयात उपस्थित आहेत. इरफानने मार्च 2018 मध्ये आपल्याला कॅन्सर झाला असल्याचे जाहीर केले होते. यानंतर त्याने सर्व कामं थांबवून उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. 2019 मध्ये परतल्यानंतर इरफानने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. चित्रपटातील अभिनयासाठी इरफानचे कौतुक करण्यात आले होते. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. 13 मार्च 2020 रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्रा, लॉक़ाउनमुळे 6 एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला होता.