नांदेड :-(माधव मेकेवाड) – आमचा उमेदवार कमळ आहे असे सांगत मुखेड कंधार मतदार संघात भेटी गाठी सुरू झाल्या आहेत.नांदेड लोकसभे मध्ये अशोक चव्हाण यांचा पराभव एक सामान्य आमदार चिखलीकर यांनी केल्याने आमदारकी लढवण्यासाठी डझन भर कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. आता मुखेड – कंधार विधानसभा मतदार संघात २०१९ च्या निवडणूकीचे वारे वाहु लागले असुन यात भावी आमदार होण्यासाठी उमेदवारांची संख्येत वाढ होताना दिसत असुन आतापासुन आप आपल्या पध्दतीने तालुक्यात गाठी भेटीचा व पक्ष वाढीचा जोर वाढवला असुन मला देवेंद्र फडणवीस व चिखलीकर आमदार करणार,मला आमदारकीचे तिकीट मिळणार या विचाराने तालुक्यात अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बाधल्याचे चित्र दिसून येत आहे.
मागील २०१४ च्या विधानसभेच्या निवडणूकीत प्रामुख्याने भाजपाचे स्व गोविंद राठोड हे चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते पण त्यांचा हृदय विकाराच्या आजाराने पडद्याआड नेलं. ते अनेक जणांचे प्रेमी बनलेले होते त्या ठिकाणी डॉ. तुषार राठोड व कॉग्रेस चे हाणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्यात लढत झाली. कै. आ.गोविंदराव राठोड यांचे ह्यदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने घेतलेल्या पोटनिवडणूकीत डॉ. तुषार राठोड हे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले.पण २०१९ च्या विधानसभेसाठी मुखेड – कंधार मतदार संघातून भाजपाकडून आ.डॉ. तुषार राठोड हे देखील इच्छुक असून पक्षाने जर नवीन कार्यकर्त्यास संधी दिली तर माधव आण्णा साठे यांना उमेदवारी मिळू शकते अशी प्राथमिक चर्चा मतदार संघातून होत आहे.माधव आण्णा साठे यांनी गेल्या महिण्यामध्ये भाजपाच्या उमेदवारीसाठी मुंबई गाठल्याचा चर्चा संबंध मतदार संघात जोरात सुरू आहे. माधव आण्णा साठे हे भारतीय जनता पार्टीचे २१ वर्ष जुने सक्रिय कार्यकर्ते असून ते भाजपचे बीज त्या गटात वाढवले असल्याने त्यांची ओळख सम्पूर्ण मतदार संघात झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी पक्ष वाढीला खूप जोमाने कामे केली आहेत .
ओबीसी नेते ,पदमशाली समाजाचे नांदेड जिल्ह्याचे प्रौढ अध्यक्ष असल्याने समाजाचा देखील ह्या मतदारसंघात फार मोठा फायदा भाजपा पार्टी ला होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे.येवती गटातील उमेदवारासाठी खुद्द अशोक चव्हाण येऊन प्रचार केल्याने देखील त्यांना १२०० मताची लीड मिळून त्यांनी भाजपचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आले.म्हणून त्यांच्या कार्याकडे पाहून पक्षातील बडया नेत्यांची गाठीभेठी होत असतात. व माधव साठे यांनी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री,पालक मंत्री,रेल्वे मंत्री यांच्या भेटी घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.मुखेड कंधार मतदार संघात ओबीसी समाज सर्वात जास्त पण इतर समाजाचे ही माधव आण्णा साठे यांना तिकीट मिळावे ह्या साठी प्रचार प्रसार सुरू असलेले चित्र मतदार संघात दिसत आहे. माधव आण्णा साठे यांच्याशी पोलीसनामा प्रतिनिधी बोलताना म्हणाले की मी पक्षाचा प्रामाणिक व २१ वर्ष पेक्षा जास्त काळ एकनिष्ठतेने काम केलेले कार्यकर्ता आहे. म्हणून मी आज जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो जर मला पक्षाने आमदारकी लढवण्यास सांगितले तर मी संपूर्ण ताकतीनिशी लढवणार आहे तसे माझे संपर्क कार्य जनतेच्या घराघरात सध्या सुरूच आहे. सध्या तरी आमचा उमेदवार कमळ आहे आम्ही त्याचा प्रचार प्रसार करीत आहोत असे ते म्हणाले.