नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात चालू असून काहीच दिवसांवर मतदान आले असून आता आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये शाब्दिक वार सुरु झाले आहेत. यात भाजपचे अनेक नेते वादग्रस्त विधान करत असून भाजपचे राष्ट्रीय सचिव तरुण चुघ यांनी शाहीन बागेची तुलना दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटबरोबर केली आहे. चुघ यांनी शाहीन बाग म्हणजेच शैतान बाग आहे, असे वादग्रस्त ट्विट केले आहे.
तर भाजपचे अनुराग ठाकूर यांच्या गोळी मारण्याला समर्थनही चुघ यांनी केले आहे. आम्ही दिल्लीला सिरिया बानू देणार नाही. त्यांना इसिसच्या धोरणानुसार काम करू देणार नाही. ते मुख्य रस्त्यांना ब्लॉक करून दिल्लीतील लोकांच्या मनात भीती पसरवण्याचे काम करत आहेत. पण आम्ही तसे होऊ देणार नाही. आम्ही दिल्लीला जळू देणार नाही, असेही चुघ यांनी म्हटले आहे. अजून एक ट्विटद्वारे अनुराग ठाकूर यांचे समर्थन करत देशद्रोह्यांना चुकीचे काम करू देणार नाही. भारताच्या अखंडतेला कोणालाही तोडू देणार नाही. शाहीन बागचा अर्थ हा शैतान बाग असा होता. भारतात हाफिज सईदच्या विचारांना या ठिकाणी ठार लागू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच भाजपच्या अनेक नेत्यांनी शाहीन बागवर निशाणा साधत तुमचे एक मतदान हे नजफगडच्या शाहीन बागसोबत आहे की भारत मातासोबत आहे, हे सिद्ध करेल, असे भाजपचे अमित शहा यांनी नजफगडच्या एका रॅलीत म्हटले होते. तर भाजपचे खासदार परवेश वर्मा यांनी शाहीन बागची तुलना काश्मिरसोबत करत दिल्लीत भाजप सत्तेत आल्यास शाहीन बाग एका तासात रिकामे करू, असे वक्तव्य केले आहे.