सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक प्रचारात 18 डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते (Sachin Satpute) याला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी (Sindhudurg Rural Police) दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक (Arrested) केली आहे. सचिन सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. म्हणून या प्रकरणी नितेश राणे यांची तीनवेळा कणकवली पोलिसांनी चौकशी केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. प्रदीप दत्तात्रय घरात (Adv. Pradeep Dattatraya Gharat) मुंबई आणि सह अभियोक्ता म्हणून अॅड. भूषण रामचंद्र साळवी (Adv. Bhushan Ramchandra Salvi) यांची नियुक्ती केली गेली आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे (SP Rajendra Dabhade) यांनी सदर पत्र अपर मुख्य सचिव गृह विभाग महाराष्ट्र सरकार यांना पत्राद्वारे कळवलं आहे. त्यामुळे शिवसैनिक परब यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ला नितेश राणेंची अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी अटक पूर्व जामिनासाठी (Pre-arrest bail) जिल्हा सत्र न्यायालयात (District Sessions Court) धाव घेतली आहे. यावर उद्या मंगळवारी सुनावणी (Hearing) होणार आहे.
Web Title :- BJP MLA Nitesh Rane | shivsena workers attack case BJP MLA nitesh ranes pre arrest bail application heard in court tomorrow