नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाहनचालकांसाठी कामाची बातमी आहे. ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) मिळवण्यासाठी तुम्हाला यापुढे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) फेर्या मारण्याची, लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) बनवण्याचे नियम अतिशय सोपे केले आहेत.
DL साठी आवश्यक नाही ड्रायव्हिंग टेस्ट
ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता तुम्हाला RTO ला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत, हे नियम या महिन्यापासून लागू झाले आहेत. या नव्या बदलामुळे, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये पडलेल्या करोडो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन घ्यावे लागेल प्रशिक्षण
(Driving License) मिळविण्यासाठी आरटीओमध्ये टेस्टची प्रतीक्षा करणार्या अर्जदारांना मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. आता ते कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये (driving licence training school) ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करू शकतात. त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल, अर्जदारांना स्कूलकडून प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे, अर्जदाराला ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाईल.
काय आहेत नवीन नियम
प्रशिक्षण केंद्रांबाबत रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटीही आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रांच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश आहे. ते जाणून घेऊया.
1. अधिकृत एजन्सी हे सुनिश्चित करेल की दुचाकी, तीन चाकी आणि हलक्या वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांकडे किमान एक एकर जागा असेल, मध्यम आणि जड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी केंद्रांसाठी दोन एकर जागा आवश्यक आहे.
2. ट्रेनर किमान 12 वी पास असावा आणि त्याला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, त्याला वाहतूक नियमांचे चांगले ज्ञान असावे.
3. मंत्रालयाने एक शिक्षण अभ्यासक्रम देखील विहित केला आहे.
हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त 4 आठवडे असेल, जो 29 तासांपर्यंत चालेल. या ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम 2 भागांमध्ये विभागला जाईल. थिअरी आणि प्रॅक्टिकल.
4. लोकांना मूलभूत रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग,
चढ-उतारावर वाहन चालवायला शिकण्यासाठी 21 तास घालवावे लागतील.
थिअरी भाग संपूर्ण अभ्यासक्रमाच्या 8 तासांचा असेल, यामध्ये रस्ता शिष्टाचार समजून घेणे, रोड रेज, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन चालविण्याची इंधन कार्यक्षमता यांचा समावेश आहे.
Web Title :- Driving License | driving license new rules 2021 no need of driving test to get driving license centre notifies new rules
Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा भाव
Ajit Pawar | ‘संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला नाही’ – अजित पवार
WhatsApp वर मिळेल जवळच्या स्टोअर आणि रेस्टॉरंटची माहिती, जाणून घ्या नवीन फीचर