पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या (Pimpri Corona) दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. शहरात आज 38 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Pimpri Corona) नोंद झाली आहे. तर 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत 2 लाख 74 हजार 561 रुग्णांनी मात (Recover) केली आहे. शहरात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या वाढत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे) झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 4 हजार 523 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे. सध्या शहरात 411 रुग्ण सक्रिय आहेत. यामध्ये 172 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर 239 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 23 लाख 64 हजार 788 प्रयोगशाळा तपासण्यांमध्ये 2 लाख 78 हजार 764 जणांना कोरोनाची बाधा (Pimpri Corona) झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
(Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या वतीने आणि खासगी कोविड लसीकरण (Covid Vaccination) केंद्रातून लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीचे डोस दिले जात आहेत. आज दिवसभरात 8 हजार 144 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहरात 29 लाख 33 हजार 522 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title :- Pimpri Corona | Diagnosis of 38 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics
Pune Mumbai-Expressway | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या दोन तास ‘ब्लॉक’, वाहतुकीत केला ‘हा’ बदल
Pune Crime | हडपसरमधील बंटर शाळेसमोर मोठा अपघात; डंपरने पादचाऱ्याला उडवले