मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – BJP MLA Ashish Shelar | काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (Mumbai Police Control Room) फोन करुन 1993 प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट (1993 Mumbai Blast) घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी नबी खान उर्फ के.जी.एन. लाला (Nabi Khan alias K.G.N. Lala) याला अटक (Arrest) केली. यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) निशाणा साधला आहे. तसेच मुंबईचे तथाकथित रक्षणकर्ते आता तरी निषेध करणार का? असा प्रश्न आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे नाव न घेता विचारला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अशा समाजकंटकांना बळ कसे मिळते?
आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी एका मागोमाग तीन ट्विट करुन महाविकीस आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. 1993 मध्ये जसे बॉम्बस्फोट झाले, त्याप्रमाणे दोन महिन्यानंतर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होईल आणि त्यानंतर जातीय दंगली होतील, असा कॉल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नबी खान उर्फ के.जी.एन. लाला याला अटक केली आहे. तसेच 1993 च्या बॉम्बस्फोटातील काही आरोपी लालाच्या परिचयाचे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अशा घातक समाजकंटकांना बळ कसे मिळते?असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.
१९९३ मध्ये जसे बॉम्बस्फोट झाले, त्याप्रमाणे दोन महिन्यांनंतर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होणार..त्यानंतर मुंबईमध्ये जातीय
दंगली होणार, असे एका संशयिताने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कळवले.
संशयित सराईत गुन्हेगार…
1/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 9, 2023
◆पोलिसांकडून नबी याहया खान उर्फ के.जी. एन. लाला याला अटक
◆१९९३च्या बॉम्बस्फोटातील काही आरोपी लालाच्या परिचयाचे, अशी माहिती समोर.
◆आमचा मुंबईच्या तथाकथित रक्षणकर्त्यांना सवाल..
◆नवाब मलिक, दाऊदच्या व्यवहारांना संरक्षण, याकूबची कबर सजवली
आता याचा तरी निषेध करणार का?
2/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 9, 2023
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
◆या अशा घातक गुन्हेगार, समाजकंटकांना बळ कसे मिळते?
◆ राजकीय स्वार्थासाठी लांगुलचालनाच्या राजकारणाचे घातक पट कोण रचतेय?
◆ आम्ही "जागर मुंबई" मधून हेच मुंबईकरांसमोर उघड करतोय…
आम्ही स्वार्थासाठी "मशाल" पेटवलेली नाही
आम्ही मुंबईकरांसाठी लढतोय!
3/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 9, 2023
याकूबची कबर सजवली…
नवाब मलिक (Nawab Malik)-दाऊदच्या व्यवहारांना संरक्षण दिले. याकूबची कबर (Yakub Memon Grave) सजवली. मुंबईचे तथाकथित रक्षणकर्ते याचा तरी निषेध करणार का? राजकीय स्वार्थासाठी लांगुलचालनाच्या राजकारणाचे घातक पट कोण रचतेय? आम्ही ‘जागर मुंबई’ मधून हेच मुंबईकरांसमोर उघड करतोय, आम्ही स्वार्थासांठी ‘मशाल’ पेटवलेली नाही आम्ही मुंबईकरांसाठी लढतोय, असेही ते म्हणाले.
Web Title :- BJP MLA Ashish Shelar | ashish shelar criticized mahavikas aghadi including shivsena after mumbai blast threatening call
हे देखील वाचा :