बहुजननामा ऑनलाईन टीम – Farhan Akhtar – Shraddha Kapoor | आज अभिनेता दिग्दर्शक गायक फरहान अख्तर त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. 9 जानेवारीला मुंबई येथील इराणी मुस्लिम कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. जाणून घेऊया फरहान अख्तरच्या लव लाईफ विषयी. (Farhan Akhtar – Shraddha Kapoor)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अभिनेता फरहानने आजवर अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. त्यापैकी गाजलेले चित्रपट म्हणजे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाने तर त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले होते. कित्येकदा फरहानचे वैयक्तिक आयुष्यही वादांनी भरलेले होते. 2000 मध्ये फरहानने हेअर स्टायलिस्ट अधुना भाबानीसोबत लग्न गाठ बांधले होते. अधुना फरहान पेक्षा अकरा वर्षांनी मोठी होती. लग्नाच्या सतरा वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना दोन मुली देखील होत्या.
यानंतर फरहानचे नाव अभिनेत्री श्रद्धा कपूरशी जोडले गेले होते. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा जोरात सुरू होती. 2016 मध्ये आलेल्या ‘रॉक ऑन 2’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या दोघांमधील जवळीक वाढली होती.
तर दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या.
मात्र श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांना हे मान्य नव्हते.
आपल्या मुलीचे नाव तिच्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीशी जोडले जाऊ नये असे त्यांना वाटत होते.
त्यामुळे शक्तीने श्रद्धाला फरहान सोबतच्या नात्याला पुढे न नेण्याचा इशारा दिला.
असेही बोलले जाते की एके दिवशी शक्ती कपूर आणि अभिनेत्रीची मावशी पद्मिनी कोल्हापुरी
यांनी अचानक फरहानच्या घरी पोहोचले आणि तिथून श्रद्धा कपूरला रागात बाहेर घेऊन आले
ही माहिती फरहानच्या शेजारच्यांनी मीडियाला दिली होती. जेव्हा या मुद्द्यावर शक्ती कपूरला विचारण्यात आले
तेव्हा त्यांनी हे सगळे खोटे आणि मूर्खपणाचे असल्याचे सांगितले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Farhan Akhtar – Shraddha Kapoor | farhan akhtar birthday when he was in love with shraddha kapoor know reason of their breakup
हे देखील वाचा :
Bigg Boss Marathi 4 | ‘बिग बॉस’ फेम आरोह वेलणकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत