बहुजननामा ऑनलाइन टीम – भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दोन आठवड्यांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, आता योग्य उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
“तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर मी कोरोनातून पूर्णपणे बरा झालो आहे.” अशा आशयाचे ट्विट नितीन गडकरी यांनी केलं आहे.
https://twitter.com/nitin_
दरम्यान, नितीन गडकरी हे कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्या समर्थनकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. नितीन गडकरी यांना गेल्या दोन आठवड्यापूर्वी अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. तेव्हा चाचणी अहवाल सकारात्मक प्राप्त झाला होता. तसेच त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना चाचणी करण्याचे आवाहन केलं होते.