नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्याची मर्यादा ३१ मार्च २०२० रोजी संपणार आहे. याच तारखेला हे दोन दस्तावेज लिंक नाही केले तर तुम्ही मोठया अडचणीत सापडू शकता. कारण आयकर विभागानुसार तुम्ही वेळेवर जर आधार लिंक नाही केले तर तुमचा Permanant Account Number म्हणजे ‘पॅनकार्ड’ निष्क्रिय केले जाईल. यानंतर कोणत्याही महत्वाच्या ट्रांजॅक्शनसाठी पॅन नंबर दिल्यावर १० हजार रु. पर्यंत दंड बसू शकतो. या दोन्ही डॉक्युमेन्टला लिंक केले तर तुम्हाला होणाऱ्या अडचणींपासून वाचू शकता.
जाणून घ्या काय आहे आधार कार्ड लिंकिंगची प्रोसेस-
१. सर्व प्रथम आपल्याला आयकर इफायलिंग पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.
२. वेबसाइटच्या डाव्या बाजूला तुम्हाला ‘ Link Aadhaar ‘ हा पर्याय दिसेल.
३. त्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
४. यानंतर आपल्यासमोर एक नवीन टॅब उघडेल. यामध्ये तुम्हाला पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि आधार कार्डवर असलेले नाव टाकावे लागेल.
५. यानंतर अटी व शर्तींची लिंक देऊन व कॅप्चा कोड भरुन तुम्ही या दोन कागदपत्रांना लिंक करू शकता.
यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन येईल आणि जर तुम्ही दोन्ही दस्तावेज पहिल्यापासून लिंक केले असतील तर तुम्हाला तशी सूचना मिळून जाईल. तुम्हाला या पोर्टलवर लॉगिन करायचीही गरज नाही. तुमच्याकडे फक्त १२ आकडी आधार संख्या आणि पॅनकार्ड तपशील असला पाहिजे. याशिवाय तुम्ही एसएमएस द्वारेही या दस्तावेजांना लिंक करू शकता.
अशा प्रकारे करा एसएमएस द्वारे आधार कार्ड पॅनकार्ड लिंक
आपण एसएमएसद्वारे पॅनला आधारशी लिंक करू शकता. यासाठी, आपल्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन UIDPAN<१२ अंकी आधार><१० अंकी पॅन> टाइप करा आणि ते 567678 किंवा 56161 वर पाठवावे लागेल.