नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रुपयात मोठी घसरण झाल्याने देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या सध्याच्या भावात गुरुवारी किरकोळ वाढ झाल्याची नोंद केली गेली आहे. सोन्यामध्ये गुरुवारी ३१ रु.ची वाढ झाली असून यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची किंमत ४०,७१८ रु. प्रति ग्रामवर आली आहे. भारतीय रुपयाने पहिल्यांदाच गुरुवारी एका डॉलरच्या तुलनेत ७५ रु. पातळीवर आला आहे. महत्वाचे हे आहे कि बुधवारी सोने ४०,६८७ रु. प्रति १० ग्रामवर बंद झाले होते.
पण चांदीच्या किंमतीत गुरुवारी घट नोंदवली गेली असून १९० रु.ची घट नोंदवली गेली आहे. ही घट झाल्यामुळे चांदीचा भाव ३५,४४४ रुपये प्रति किलोग्रॅमवर आला आहे. चांदी बुधवारी ३५,६३४ रु. प्रति किलोग्रॅम किंमतीवर बंद झाला होता. दिल्लीत बुधवारी २४ कॅरेट सोन्याच्या हाजीर भावात ३१ रु.ची वाढ झाली आहे. रुपयात मोठी घसरण आल्याने आणि जागतिक किंमतीत सोन्याच्या देशांतर्गत किंमतीत ही किरकोळ वाढ नोंदवली गेली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तर सोने आणि चांदी दोन्हींच्या किंमती गुरुवारी स्थिर राहिल्या. सोने १,४८२ डॉलर प्रति औस आणि चांदी ११.९७ डॉलर प्रति औसवर आहे.गुरुवारी एका डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ७४.९५ वर होता, तो ६९ पैशांनी कमी झाला असून बुधवारी ते ७४.२६ वर बंद झाले. गुरुवारी झालेल्या कामकाजादरम्यान रुपयामध्ये मोठी घसरण दिसून आली, ज्याने सोन्याच्या किंमतींना सपोर्ट दिला असून परकीय गुंतवणूकदारांनी वेगाने भारतीय बाजारातून पैसे काढून घेतल्यामुळे रुपयाची घसरण होत आहे.