नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणात २० मार्चला दोषींना फाशी देण्याचा मार्ग साफ झाला असून पटियाला हाऊस कोर्टाने चार दोषींच्या डेथ वॉरंटवर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने याबाबत दाखल केलेल्या याचिकेला फेटाळले असून आता सगळ्या दोषींना शुक्रवारी सकाळी फाशी दिली जाणार आहे.
तुम्ही माझ्या आईसारख्या आहात, फाशी थांबवा
गुरुवारी पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी दरम्यान हाय वोल्टेज ड्रामा झाला. कोर्ट रूममध्ये दोषी अक्षय कुमारच्या पत्नीने न्यायाधीशांसमोर रडणे सुरु केले. अक्षय कुमारच्या पत्नीने निर्भयाच्या आईला स्पर्श करत म्हटले कि तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. या फाशीला थांबवा.
सर्वोच्च न्यायालयातही अक्षयची याचिका फेटाळली
एकीकडे सर्वोच्च न्यायालयानेही निर्भया प्रकरणातील दोषी अक्षय कुमारची याचिका फेटाळली असून त्याने राष्ट्रपतींद्वारे त्याची दया याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले होते. सर्वोच्च न्यायालयात दोषींचे वकील एपी सिंह यांनी म्हटले की, पोलिसांनी अक्षयला मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्यांनी म्हटले कि थर्ड डिग्रीचा वापर केला आहे. एपी सिंह यांनी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांचा उल्लेख करत म्हटले की, त्यांने सल्ला दिला होता कि निर्भया प्रकरणात मृत्यूची शिक्षा मिळालेले मुले तरुण आहेत आणि त्यांच्यावर दया दाखवली पाहिजे.
पाकिस्तान बॉर्डरवर पाठवा, पण फाशी देऊ नका
एपी सिंह म्हणाले की, राजकारणासाठी यांच्या आयुष्याचा वापर होत आहे. यांच्या आयुष्याचा वापर करा, त्यांना पाकिस्तान बॉर्डरवर पाठवा, चीनला पाठवा, पण त्यांचे आयुष्य घेऊ नका, असेही एपी सिंह म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, फाशी दिल्याने बलात्कार कमी होणार आहेत का ? ६ महिन्यानंतर सगळी लोकं या प्रकरणाला विसरून जातील, पण कुटुंब उद्धवस्त होईल. एपी सिंह म्हणाले कि त्यांना जेलमध्ये राहू द्या, मेडिकल ट्रायलसाठी त्यांचा वापर करा, पण फाशी नका देऊ.