नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमध्ये गुरुग्रामवरुन वडिलांना सायकलवर बसवून तब्बल 1 हजार 200 किलोमीटर प्रवास केलेल्या ज्योतीचे खूप कौतुक होत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पनेही ट्वीट करत ज्योतीचे कौतुक केले आहे.
ट्वीट करताना इवांकाने, ”15 वर्षाची ज्योती कुमारी आजारी वडिलांना सायकलवर बसवून सात दिवसात 1 हजार200 किमीचे अंतर पार करत गावी घेऊन गेली. सहनशक्ती आणि प्रेमाच्या या वीरगाथेने तिने भारतीय लोक आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता सायकलिंग फेडरेशननेही तिची दखल घेतली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावले आहे. ज्योतीने चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली, तर राष्ट्रीय सायकलिंग अकादमीच्या कॉम्प्लेक्समध्ये ट्रेनी म्हणून तिची निवड होऊ शकते. आम्ही ज्योतीशी बोललो, लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही तिला दिल्लीला बोलावले आहे.
https://twitter.com/IvankaTrump/status/1263828899575758849
तिच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च संघटनेतर्फे केला जाईल. तिला आपल्यासोबत कोणाला घेऊन यायचे असेल तरीही आम्ही त्याला परवानगी देऊ. आम्ही बिहारमधील आमच्या अधिकार्यांशी संपर्कात आहोत. लॉकडाऊन संपल्यानंतर तिला दिल्लीला चाचणीसाठी कसे पाठवता येईल याची चर्चा सुरु आहे, असे संघटनेचे ओंकार सिंह यांनी सांगितले आहे. ज्योती कुमारी लॉकडाऊन जाहीर होण्याआधी गुरुग्राम येथे वास्तव्यास होती. ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाऊन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाले. आजारी वडिलांना कोणत्याही परिस्थितीत बिहारला गावी नेण्यासाठी तिने सायकवरुन पृवास सुरु केला. सात दिवसांत तिने 1 हजार 200 किमीचा टप्पा गाठत वडिलांना सुखरुप घरी पोहोचवले आहे.