बहुजननामा ऑनलाइन टीम – बिग बॉस (Bigg Boss Hindi) चे एक्स स्पर्धक स्वामी ओम (Swami Om) यांच्याबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. काही वेळापूर्वी स्वामी ओम यांचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांना तीन महिन्यांपूर्वीच कोरोनाची लागणही झाली होती. यानंतर एम्समध्ये त्यांच्यावर उचपार सुरू होते. आता काही वेळूपूर्वीच त्यांनी NCR च्या लोनीमधील DLF अंकुर विहारमध्ये अखेरचा श्वास घेतला.
15 दिवसांपासून बिघडली होती तब्येत
एका मुलाखतीत त्यांचा मित्र मुकेश जैनचा मुलगा अर्जुन जैननं ही माहिती देत सांगितलं की, 15 दिवसांपूर्वीच त्यांना पॅरालिसिस झाला होता. यानंतर त्यांची स्थिती खराब झाली होती. काही वेळापूर्वीच त्यांचं निधन झालं.
अलीकडेच मिळाला होता कोर्टाकडून दिलासा
2017 मध्ये गोपनियतेसारख्या गंभीर मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं 24 ऑगस्ट 2017 रोजी बिग बॉसमुळं चर्चेत आलेल्या स्वामी ओम यांना 10 लाखांचा दंड ठोठावला होता. स्वामी ओम यांनी याचिकेत म्हटलं होतं की, हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची नियुक्ती करताना CJI कडून शिफारस का घेतली जाते. यावर CJI खेहर आणि जस्टीस डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाकडे ही केस आली तेव्हा कोर्टानं सांगितलं की, हा पब्लिसिटी स्टंट आहे. परंतु स्वामी ओम यांनी यावर उत्तर दिलं होतं की, बिग बॉसमधून त्यांनी आधीच पब्लिसिटी मिळवली आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी कोर्टानं त्यांना 10 लाखांऐवजी 8 हप्त्यात 5 लाख रुपये जमा करायला सांगितलं हो