बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. नोकरी गेलेल्यांना दिलास देण्यासाठी सरकारकडून विविध क्षेत्रांमध्ये नोकर भरती केली जात आहे. अनेकांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते, अशा तरुणांना सरकारी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. भारताचे महालेखापाल म्हणून ज्या संस्थेची धास्ती साऱ्या राज्य सरकारांना असते त्या कॅगमध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे.
कॅमध्ये तब्बल 10811 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी योग्य आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन अर्ज करु शकणार आहेत. यासाठी अधिकृत नोटीस cag.gov.in वर जाऊन पाहता येणार आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार 6409 जागा लेखा परीक्षक आणि 4402 पदे लेखापाल म्हणून भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी आहे.
अर्ज कसा करायचा
CAG Recruitment 2021 साठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन व्यवस्थित वाचावे. यानंतर अर्ज डाऊनलोड करावा. अर्ज काळजीपूर्वक भरून हा अर्ज स्पीड पोस्टाने पाठवून द्यावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
Shri V S Venkatanathan, Asstt. C&AG (N), O/o The C&AG of India, 9 Deen Dayal Upadhyay Marg, New Delhi -110124
शिक्षणाची अट
कॅगमधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड, विद्यापिठाची पदवी किंवा समकक्ष पदवी असणे बंधनकारक आहे. अर्जदाराचे वय 18 ते 27 वर्षे ठेवण्यात आले आहे. तसेच वेगवेगळ्या आरक्षणानुसार वयात सूट दिली जाणार आहे.
वेतन
दोन्ही पदांसाठी वेतन 2920-92300 हजार प्रतिमहिना दिले जाणार आहे. तसेच थेट नियुक्ती केली जाणार आहे. उमेदवाराच्या योग्यतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे.
नोटीफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://cag.gov.in/uploads/