बहुजननामा ऑनलाइन टीम – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसत आहेत. घरात आल्यापासून ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) काही ना काही कराणानं चर्चेत येत आहे. अनेकदा राखी अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) वरील तिचं प्रेम व्यक्त करताना दिसली आहे. राखीला अनिभव आणि घरातील इतरही लोक खूप वैतागले आहेत. खास करून अभिनवची पत्नी रूबीना दिलैक जास्त वैतागलेली दिसत आहे. सध्या राखी अभिनव आणि रूबीना यांची खूप चर्चा आहे. कोणत्या ना कोणत्या कारणानं तिघांबद्दल बोलालं जात आहे. असा सगळा सीन असताना आता फिनालेआधीच बिग बॉस 14 च्या विनरचं नाव समोर आलं आहे.
फिनाले से पहले BB-14 के विनर के नाम का ऐलान! pic.twitter.com/TIbXwKtan8
— TimePass (@TimePassTalks) February 2, 2021
बिग बॉसच्या फिनालेला अद्याप काही आठवडे बाकी आहेत. परंतु त्याआधीच गुगलनं बिग बॉस 14 च्या विनरचं नाव सांगितलं आहे. जर गुगलवर Bigg Boss 14 Winner असं सर्च केलं तर रूबीनाचं नाव दाखवलं जात आहे. ही बाब समोर आल्यानंतर चाहतेही गोंधळले आहेत. अॅक्ट्रेस मात्र यामुळं खूप आनंदित दिसत आहे.
गुगल सर्च केल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की, तिथं रूबीनाचं नाव का दाखवलं जात आहे. अनेकांनी याचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या चाहत्यांमध्ये बिग बॉस विनरला घेऊन चर्चा सुरू आहे.