बहुजननामा ऑनलाइन टीम – ई कॉमर्स वेबसाईट Myntra ही अलीकडेच ब्रँड लोगोमुळं ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. यानंतर त्यांना त्यांचा ब्रँड लोगो बदलावा लागला. महिलांचा अपमान केल्याचा आरोप करत केस दाखल करण्यात आली होती.
तक्रार दाखल झाल्यानंतर Myntra ला त्यांचा लोगो बदलावा लागला. लोगोवरून वाद झाल्यानंतर अनेक लोक यावर प्रतिक्रिया देऊ लागले. काही सेलेब्सनंही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूड स्टार, फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमन (Milind Soman) यानंही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मिलिंदनं एक ट्विट केलं आहे, ज्यात त्यानं मिंत्राच्या ब्रँड लोगोच्या वादारून चिमटा काढला आहे. मिंत्राचं नाव न घेता मिलिंदनं लिहिलं की, आता लेटर M कधीच आधीसारखं राहणार नाही.
The letter M will never be the same again.
— Milind Usha Soman (@milindrunning) January 31, 2021
सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट सपना भवनानी हिनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, आता नव्या ब्रँड लोगोच्या पब्लिसिटीसाठी काय शानदार पद्धत आहे मिंत्रा. अॅडव्हर्टाइजमेंट गुरू खरंच हा खेळ पुढे नेत आहेत. आधी तनिष्क आणि आता हे. कॉन्ट्रोव्हर्सियल काहीतरी करा आण पब्लिकाला मार्केटींग करू द्या.
— TimePass (@TimePassTalks) February 2, 2021