नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसची भीती असून त्याचा परिणाम सतत देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावर होत आहे. परिणामी शेअर बाजार खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत चालला असून सोन्याचे भाव उतरत आहेत. मागच्या १० दिवसात सोन्याचा भावात ५ हजार रु.नी घट नोंदवली गेली असून सोन्याचे दर ३९,६६१ रु. प्रति १० ग्राम झाले आहे. तसेच १० ग्राम सोन्याचा दर १९४९ रु.नी घसरला असून ३९,६६१ रु. झाला आहे.
तर दुसरीकडे चांदीचाही दर प्रति किलो ६४४५ रु.नी घसरला असून सोमवारी दिल्लीत सोन्याचा भाव ४५५ रु.ने वाढत ४१,५६१० रु. प्रति १० ग्राम झाला होता. पण चांदी १,२८३ रु.नी घसरत ४०,३०४ रु. किलो झाला आहे. तर शुक्रवारी सोन्याचा दर १० ग्राम ४२,०१७ रु.वर बंद झाला होता.या मौल्यवान धातूंचा व्यापार फक्त सराफा बाजारात होत असून सोन्याची दोन प्रकारे केली जाते. सामान्य लोकं सराफा बाजारातून सोन्याची खरेदी करण्यासोबतच व्यावसायिक लोकंही वायदा बाजरातून सोन्याची खरेदी करतात.
कोरोनाचा परिणाम सोन्याच्या भावावर जास्त करून पडला असून या व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदवली जात आहे. मार्च १३ ला सोन्याच्या भावात २६०० रुपयांची घसरण झाली असताना सोने ४१,५५६.०० रु.वर आले होते. तर चांदीच्या दरातही घसरण नोंदवली गेली होती. सोन्याचे दर उतरल्याने ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी होत आहे.