मुजफ्फरपुर : वृत्तसंस्था – बिहारच्या मुजफ्फरपूरच्या कोर्टात कोरोना व्हायरससाठी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना दोषी ठरवत त्यांच्या विरुद्ध एक परिपत्र दाखल केले गेले आहे. अधिवक्ता सुधीर कुमार ओझा यांनी कोरोना व्हायरसबाबत चीनवर कट रचल्याचा आरोप लावत सोमवारी मुख्य न्याय दंडाधिकारी कोर्टात त्यांचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि भारतात त्यांचे राजदूत सुन विदोंग यांच्या विरोधात कलम १०९ बी, २६९ आणि २७० च्या अंतर्गत एक अपमान पत्र दाखल केले आहे.
मुजफ्फरपूरच्या मिठनपुरा पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी ओझा यांच्याकडून दाखल केलेल्या अपमान पत्राची सुनावणी ११ एप्रिलला कोर्टाकडून होणार आहे. सुधीर ओझा यांनी आरोप लावला आहे की, चीनने महासत्ता बनण्यासाठी कोरोना व्हायरसचा कट आणि षडयंत्र केले होते. १९८१ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक ‘आईज ऑफ डोकेन्स’ मध्ये याचा खुलासा होत आहे. कोरोना व्हायरस चीनमधील वुहानमधील एका लॅबमध्ये सगळ्यांपासून लपून बनवला होता.
पुस्तकात लिहिले आहे कि चीन याचा वापर लॉजिकल हत्याराच्या स्वरूपात करेल. अधिवक्त्याचा आरोप आहे कि चीनने कटअंतर्गत कोरोना व्हायरसचा वापर केला आहे. भारतात या आजाराने अनके लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनके लोकं या आजाराने पीडित आहेत. चीनने जाणूनबुजून असे केले आहे, जेणेकरून या आजाराने लोकांचा मृत्यू होईल आणि आर्थिक नुकसान होईल.