बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या फेमस शो कौन बनेगा करोडपतीचं (Kaun Banega Crorepati) सूत्रसंचालन करत आहे. अमिताभ बच्चन सोशलवर कायमच अॅक्टीव्ह असतात. अनेकदा त्यांनी शेअर केलेली पोस्ट सोशलवर चर्चेत आल्याचं (2021 memes)दिसतं. अमिताभनं नुकताच एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळं ते चर्चेत आले आहेत.
अमिताभ यांनी ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, कृपा कृपा कृपा. जो फोटो त्यांनी शेअर केला आहे त्यावर लिहिलंय 2021. सोबतच त्याला लिंबू मिरची लटकताना दिसत आहे. जेणेकरून 2021 ला कोणाची नजर ना लागो.
https://twitter.com/SrBachchan/status/1338492901991407622?s=20
बिग बींचा हा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिग बींचं हे मीम चाहत्यांनाही खूप आवडलं आहे. कारण आता 2020 मधील कोरोनाच्या संकटानंतर 2021 कडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत.
अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.