जळगाव :बहुजननामा ऑनलाईन – Bhusawal News | वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सहभाग असलेल्या आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या भुसावळ येथील खरात टोळीवर (Kharat gang Bhusawal) तडीपारीची कारवाई (tadipar action) करण्यात आली आहे. खरात टोळीतील 5 जणांना 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये भाजपचा नगरसेवक राजकुमार रवींद्र खरात (BJP Corporator Rajkumar Kharat) याचा समावेश आहे. भाजप नगरसेवकावर झालेल्या तडीपारीच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजप नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या याचा निर्घृण खून करण्यात आला होता. रवींद्र खरात त्याचा भाऊ आणि त्यांची मुले असे एकूण पाच जणांचा एकाचवेळी खून (Murder) केल्याने हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते. यानंतर त्यांच्या प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये (By-election) त्यांचे चिरंजीव राजकुमार रवींद्र खरात यांना सर्वांनी मिळून बिनविरोध निवडून आणले.
यानंतर खरात व त्याच्या साथिदारांचा अनेक गुन्ह्यामध्ये समावेश असल्याचे समोर आले. खरात टोळीवर अनेक गुन्हे दाखल असून अनेकांना धमकावण्यात देखील या टोळीचा समावेश असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
टोळी प्रमुख अतिश रविंद्र खरात (वय-25 रा. सामना नगर, भुसावळ), टोळी सदस्य राजकुमार उर्फ सनी रविंद्र खरात (वय-27 रा. समता नगर, भुसावळ), हंसराज रविंद्र खरात, राजन उर्फ गोलू रविंद्र खरात (वय-22), अमोल उर्फ चिन्ना शाम खिल्लारे (वय-25 शमुखवाडी रेल्वे वॉटर टँक, हनुमान मंदिरा जवळ अकोला, हल्ली रा. समता नगर, भुसावळ) या पाच जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (Superintendent of Police Dr. Praveen Mundhe) यांनी तडीपारीचे आदेश जारी केले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तडीपारीचा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी (Additional Superintendent of
Police Chandrakant Gawli), पोलीस उप अधीक्षक सोमनाथ वाघचौरे (Deputy
Superintendent of Police Somnath Waghchaure) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
निरीक्षक बाळासाहेब ठोंबे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, सहायक फौजदार अनिल
चौधरी, हवालदार संदीप चव्हाण, पोलीस नाईक विनोद तडवी यांनी तयार केला होता. त्याला आज
मान्यता मिळाल्याने खरात टोळीवर दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
web title: Bhusawal News | 5 including BJP corporator Rajkumar Kharat deported for 2 years, excitement in political circles.
Pune Crime | बाईक स्टंक करणे पडले महागात, वीजेच्या खांबाला धडकून गमावला जीव; पुण्यातील घटना
Corona in Pune | लसीकरणानंतरही पुणे जिल्ह्यात आढळले 7 हजार 636 ‘कोरोना’बाधित