भोपाळ : वृत्तसंस्था – आयपीएस सर्व्हिसच्या बैठकीदरम्यान भोपाळमध्ये मोठ्या तलावात जहाज पलटली असून त्यात काही आयपीएस ऑफिसर आणि त्यांचे कुटुंब सामील होते. मध्यप्रदेशचे डीजीपी विजय कुमार यांची पत्नीही या जहाजामध्ये उपस्थित असून वॉटर स्पोर्ट्सदरम्यान ही घटना घडली आहे. जहाज पलटल्यावर जवळ असलेल्या इतर जहाज मदतीसाठी पुढे सरसावत सगळ्या सुरक्षित लोकांना बाहेर काढले गेले.
पोलीस वेलफेयरचे डीजीपी विजय कटारिया यांनी सांगितले की, जहाजमध्ये उपस्थित सगळ्या लोकांनी लाईफ जॅकेट घातले असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रत्येकवेळी आयएएस आणि आयपीएसच्या मीटमध्ये अधिकारी वॉटर स्पोर्ट मध्ये सहभाग घेतात, ज्यात सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट आणि सेफ्टी बोट तैनात असतात.
Madhya Pradesh: 8 people, including Indian Police Service (IPS) officers, were rescued after their boat capsized in Badi Jheel, during an IPS meet water sports event in Bhopal,
today. pic.twitter.com/asMuH5MBKY— ANI (@ANI) February 20, 2020
भोपाळमध्ये आयएएस बैठक २०२० सुरु असून एक दिवस अगोदर पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबासोबत मौजमजा केली होती. पहिल्या दिवशी सकाळी मोतीलाल नेहरू स्टेडियम मध्ये आयएएस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेट मॅचचे आयोजन केले होते. डीजीपी वी. के. सिंग आणि एजीडी डी. श्रीनिवास राव यांच्या टीममध्ये मॅच खेळली गेली. या मॅचमध्ये आयजी योगेश चौधरी यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ मिळाला होता.
यांनतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असताना त्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे म्हणाले की, पोलिसांना आजपर्यंत लोकांना नाचवताना बघितले आहे. पण त्यांना नाचताना पहिल्यांदाच बघितले आहे. यादरम्यान राज्यभरातील निवडक आयएएस अधिकाऱ्यांनी ग्रुप डान्स केला असताना सर्वश्रेष्ठ डान्स मुव्हजला अधिकाऱ्यांना सन्मानितही केले गेले.