‘आम्ही 15 कोटी मुस्लिम 100 कोटींवर भारी’, MIM चे नेते वारिस पठाणांचं ‘वादग्रस्त’ वक्तव्य (व्हिडीओ)

waris-patahn

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) बाबत देशात सध्या सुरू असलेल्या चर्चेदरम्यान असुरुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाचे एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मुस्लिम महिलांच्या नेतृत्वात दिल्लीच्या शाहीन बागेत सीएएविरोधात झालेल्या निषेधाच्या संदर्भात ते म्हणाले की तुम्ही म्हणता आम्ही महिलांना पुढे केले आहे. परंतु हे लक्षात ठेवा की आतापर्यंत फक्त शेरनी बाहेर आल्या आहेत आणि तुम्हाला घाम फुटत आहे. यातून तुम्ही समजू शकता की आम्ही सर्वजण बाहेर पडलो तर काय होईल. आम्ही १५ करोड आहोत पण १०० करोडवर भारी आहोत. हे लक्षात ठेवा.

वारिस पठाण यांचे वादग्रस्त विधान असलेला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात त्यांनी असेही सांगितले की आम्ही स्वातंत्र्य हिसकावून घेऊ. वारिस पठाण हे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. गुलबर्गामध्ये सीएएविरोधी मोर्चाच्या वेळी त्यांनी हे खळबळजनक विधाने केले. १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या मेळाव्यात एआयएमआयएमचे प्रमुख असुरुद्दीन ओवैसी हे देखील उपस्थित होते.

वारिस पठाण यांनी यापूर्वीही अशी वादग्रस्त विधाने केली आहेत. हिंदूंवर अप्रत्यक्ष हल्ला करत वारिस पठाण म्हणाले की, देशातील मुस्लिमांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य मिळविण्याची वेळ आता आली आहे. त्यावेळी ते म्हणाले की देशात मुस्लिमांची लोकसंख्या १५ करोड असूनही ते सध्या १०० करोडपेक्षा जास्त हिंदूंवर अधिराज्य गाजवतात.