नवी दिल्ली : वृत्तसंस्था : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा परीक्षांवरही परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदमुळे आज, म्हणजेच 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येणाऱ्या अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारत बंदमुळे ज्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. त्यामध्ये राज्यातील विद्यापीठांच्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांचा समावेश आहे. यातील काही परीक्षांसाठी नवीन तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
– आयसीएआय सीए फाउंडेशन परीक्षा स्थगित : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) भारत बंदमुळे 8 डिसेंबर रोजी होणारी सीए फाउंडेशन परीक्षा पुढे ढकलली आहे. संस्थेने जारी केलेल्या नोटीसनुसार ही परीक्षा आता 13 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
– उस्मानिया विद्यापीठाने 8 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दरम्यान, 9 डिसेंबर रोजी घेण्यात येणा-या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांच्या नव्या तारखांची लवकरच घोषणा केली जात आहे.
– ओडिशा लोकसेवा आयोगाने राज्य नागरी सेवा मुख्य परीक्षा अंतर्गत 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. 8 डिसेंबर रोजी जनरल स्टडीज -1 आणि जनरल स्टडीज पेपर -2 चा पेपर होणार होता. आता 2 जानेवारी 2021 रोजी होईल.