नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील बरेलीमध्ये मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात आग लागल्यामुळे संशयास्पद परिस्थितीत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थिनी सुकीर्ती शर्मा हिने एमबीबीएस केल्यावर वसतिगृहात राहूनच मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्न असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना भोजापुरा पोलीस स्टेशन परिसरातील एसआरएमएस मेडिकल कॉलेजची असून घटनेचे कारण अजून समजलेले नाही. तसेच मुलीच्या घरातील सदस्यांना माहिती दिली असून घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून कारवाई सुरु केली आहे.
एसआरएमएस मेडिकल कॉलेजच्या पीजी हॉस्टेलमध्ये अचानक आग लागल्यावर खोलीमधून धूर बाहेर येताना गार्ड आणि वॉर्डनने महाविद्यालय प्रशासनाला लगेच कळवल्याची माहिती मिळत आहे. सुकीर्ती ही पाटणा येथे राहणारी असून एसआरएमएस मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होती. खोलीत लावलेल्या हिटरमुळे आग भडकली, असे कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ. एस.बी. सिंह यांनी म्हटले आहे. तसेच सकाळी-सकाळी जेव्हा वसतिगृहाच्या खोलीतून धूर बाहेर येऊ लागला तेव्हाच घटनेबाबत समजले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
डॉक्टर संसार सिंह यांनी विद्यार्थिनी सुकीर्ती हिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून एमबीबीएस झाल्यावर ती इंटर्न करत होती. ती सिंगल बेडरूममध्ये राहत होती. तिच्या बेडखाली हिटर लावले होते. महाविद्यालय व्यवस्थापन या हिटरमुळे आग लागली असल्याचे सांगत आहे. संपूर्ण खोली जाळून खाक झाली होती. दारे आणि खिडक्याही जळल्या असून विद्यार्थिनीचे पूर्ण शरीर जळून गेले आहे. सीएफओ आणि सीओ नबावगंज या प्रकरणाचा तपास करत असून मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठविण्यात आला आहे.
Visit : bahujannama.com