नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम ३७० आणि सीएए च्या समर्थनार्थ राजस्थानमधील एका व्यक्तीने आपल्या शरीरावर भारतातील सर्व राज्यांचे नकाशे आणि देशातील मुख्य स्थळे टॅटूद्वारे गोंदवून घेतली आहेत. या तरुणाचे नाव आर्यन सोनी (३३) असून त्याने शरीरावर २८ राज्ये, ९ केंद्रशासित प्रदेश आणि त्या राज्यांतील प्रमुख पर्यटनस्थळांचेही टॅटू काढले आहेत.
आर्यन सोनी हा राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात जस्सूसर या परिसरात राहणार असून शरीरावर बनवलेले हे टॅटू म्हणजे माझे देशाबद्दलचे प्रेम आहे, असे त्यानी सांगितले आहे. कलम ३७० आणि सीएए समर्थनार्थ आपल्या संपूर्ण शरीरावर अखंड भारताचा नकाशा तयार केला आहे, असे आर्यन म्हणाला. आर्यन सोनी यांच्या शरीरावर ताजमहाल, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सुवर्ण मंदिर, कुरुक्षेत्र, लडाखचा पर्वत, गेट वे ऑफ इंडिया, जैसलमेरचा ढोरे, ऐतिहासिक वास्तू आणि लाल किल्ल्यासह अनेक प्रांतातील पर्यटन स्थळे काढली असून आता तो आपले सर्व टॅटू घेऊन जिनियस, लिंक आणि इंडिया बुकमध्ये विक्रम नोंदवणार आहे.
आर्यन गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्या शरीरावर टॅटू गोंदत असल्याची माहिती मिळत आहे. २५ सप्टेंबर २०१९ ला सुरु झालेले टॅटू पूर्ण करण्याचे काम २६ जानेवारी २०२० रोजी पूर्ण होणार आहे. तो टॅटू बनवण्यासाठी दररोज ६ ते ७ तास टॅटू पार्लरमध्ये बसत असत. टॅटू काढणारे विष्णू स्वामी यांनी तो दररोज एक किंवा दोन टॅटू बनवू शकतो, असे म्हटले. पहिल्या दोन महिन्यात त्यांनी भारतातील प्रत्येक राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांसाठी एक ब्लु प्रिंट तयार केली. त्यानंतर पुढच्या दोन महिन्यात हे काम पूर्ण झाले. तसेच विष्णू स्वामी यांनी सांगितले की ते आर्यनकडून मिळालेले पैसे अनाथाश्रमात देतील. कारण याआधी जेव्हा आर्यने टॅटूच्या बदल्यात पैसे दिले आहेत, तेव्हा विष्णूने ते पुलवामा हल्ला धर्मादाय संस्था, राष्ट्रीय व्याज आणि अनाथाश्रमाला दिले आहेत.
Visit : bahujannama.com