नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी दोनवेळा पवार साहेबांचे ऐकले. तर मी का नाही ऐकणार, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला. वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र, त्यामुळे इतर धर्मांबद्दल तिरस्कार करता कामा नये, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले.
प्रतिभाताई यांच्या ८५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपुरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने नागरिक सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते . या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
यावेळी शरद पवारांनीही प्रतिभा पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले.आपल्या पदाचा देशाला व महाराष्ट्राला कसा उपयोग होईल याचा मी सातत्याने विचार केला. प्रामाणिकपणे आणि सन्मानाने राष्ट्रपतीपदाची जबाबदारी पार पाडली. प्रतिभाताईंना आपण पाच वर्ष ज्युनिअर आहोत. मात्र, आपण मुख्यमंत्री असताना प्रतिभाताई यांनी विरोधीपक्ष नेता म्हणून आपले वेगळेपण सिद्ध केले, असे शरद पवार यांनी म्हटले.
Visit : bahujannama.com