मुंबई बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची आज मुंबई (आंबेडकर भवन ,दादर ) येथे महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेणार आहेत. आज दुपारी ३ वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेत ते काय गौप्सपोट करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय काँग्रेसचे शिष्टमंडळ आज साहेबांना भेटणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जातंय.
आगामी विधानसभेला काँग्रेसने मतविभाजन टाळण्यासाठी वंचितसोबत आघाडीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. काँग्रेसकडून वंचितची काँग्रेससोबत आघाडी व्हावी यासाठी पक्षस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या दोन्ही पक्ष आघाडीबाबत सकारात्मक आहेत. असे काँग्रेस कार्यकर्त्त्यांकडून सांगितलं जातंय.
परंतु वंचित बहुजन आघाडीकडून तशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याबात प्रकाश आंबेडकर बोलतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.