कोपरगाव बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी बसच्या पाससाठी पैसे नाही म्हणून एका शाळकरी मुलीने आपले जीवन संपवले होते. त्यानंतर राज्य सरकारने याची दखल घेत बसचा पास मोफत केला होता.त्यानंतर पुन्हा एकदा असाच एक धक्कदायक प्रकार समोर आलाय. कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथून महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोपरगावसाठी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीला मानहानीजनक वागणूक देत बसमधून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या पासवर शिक्का नसल्याचे कारण देत बस कंडक्टरने रस्त्यावर उतरून देण्याचा प्रयत्न केला. संबंधित विद्यार्थिनींकडे पैसे भरून काढलेला पास होता. मात्र, त्यावर शिक्का नसल्याने तिला बसमधून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थिनी रडू कोसळले. आगार प्रमुखाने शिक्का न दिल्याने त्याची शिक्षा त्या विद्यार्थिनीला भोगावी लागली. भर रस्त्यात उतरून दिले असते आणि काही अनुचित प्रकार घडला असता तर याला कोण जबाबदार असते असा प्रश्न विचारला जातोय.
दरम्यान ,आपण एका बाजूला पडेगी बेटींया तभी तो बढेंगी बेटींया असे म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला मुलींना शिक्षणापासून डावलण्यात येतंय त्यामुळे असे प्रकार थांबतील का ,यावर राज्यसरकार काही ठोस पाऊल घेईल का ?हे बघावे लागेल.