लखनऊ : वृत्तसंस्था – सपा-बसपा आघाडीला लोकसभा निवडणूकीत अपेक्षित यश न मिळाल्याने बसपा सर्वेसर्वा मायावती यांनी यापुढे सर्व निव़डणूकांसाठी त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. समाजवादी नेतृत्तवाचं वर्तन फारसं चांगलं नव्हतं. त्यामुळे यापुढे सर्व लहान-मोठ्या निवडणूका बसपा स्वतंत्रपणे लढेल अशी घोषणा मायावती यांनी केली आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने कॉंग्रेससोबत आघाडी न करता वेगळी आघाडी स्थापन केली होती. त्यावेळी सपा बसपाला सपाटून मार खावा लागला. त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर बसपाची काल लखनऊमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीबद्दलची वृत्तं खऱी नसल्याचे मायावती यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले.
ट्विटमध्ये काय म्हणाल्या मायावती ?
आम्ही आघाडी धर्माचे पालन केले
सपासोबत आमचे मतभेद होते. २०१२ ते २०१७ दरम्यान सपा सरकारच्या काळात बीएसपी आणि दलित विरोधी निर्णय, प्रमोशन आरक्षण विरोधात केलेले कार्य, बिघडलेले कायदा सुव्यवस्था या सर्व गोष्टी आणि मतभेद विसरून आम्ही देश आणि जनहितार्थ सपा सोबत आघाडी धर्माचे पालन केले.
बीएसपी की आल इण्डिया बैठक कल लखनऊ में ढाई घण्टे तक चली। इसके बाद राज्यवार बैठकों का दौर देर रात तक चलता रहा जिसमें भी मीडिया नहीं था। फिर भी बीएसपी प्रमुख के बारे में जो बातें मीडिया में फ्लैश हुई हैं वे पूरी तरह से सही नहीं हैं जबकि इस बारे में प्रेसनोट भी जारी किया गया था।
— Mayawati (@Mayawati) June 24, 2019
पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी स्वबळावर
समाजवादी पक्षासोबत जाऊन भाजपला यापुढे हरवणे शक्य नाही. लोकसभा निवडणूकीमध्ये समाजवादी पक्षाच्या व्यवहाराने बसपाला असा विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे यापुढे पक्ष आणि चळवळीचे हित लक्षात घेऊन यापुढे होणाऱ्या सर्व लहान मोठ्या निवडणूकांमध्ये आम्ही स्वबळावर लढण्याचा विचार केला आहे.
वैसे भी जगजाहिर है कि सपा के साथ सभी पुराने गिले-शिकवों को भुलाने के साथ-साथ सन् 2012-17 में सपा सरकार के बीएसपी व दलित विरोधी फैसलों, प्रमोशन में आरक्षण विरूद्ध कार्यों एवं बिगड़ी कानून व्यवस्था आदि को दरकिनार करके देश व जनहित में सपा के साथ गठबंधन धर्म को पूरी तरह से निभाया।
— Mayawati (@Mayawati) June 24, 2019
लोकसभा निवडणूका झाल्यानंतर मायावती यांनी सपा सोबतची आघाडी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काल बसपाची बैठक पार पडली. त्यानंतर राज्यभर बैठका पार पडल्या. तरीही यासंदर्भात प्रेसनोट दिल्यानंतरही बसपा प्रमुख मायावती यांच्या बाबत काही बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्या चुकीच्या असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
बीएसपी की आल इण्डिया बैठक कल लखनऊ में ढाई घण्टे तक चली। इसके बाद राज्यवार बैठकों का दौर देर रात तक चलता रहा जिसमें भी मीडिया नहीं था। फिर भी बीएसपी प्रमुख के बारे में जो बातें मीडिया में फ्लैश हुई हैं वे पूरी तरह से सही नहीं हैं जबकि इस बारे में प्रेसनोट भी जारी किया गया था।
— Mayawati (@Mayawati) June 24, 2019