जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – समाजकल्याण सहायक आयुक्त आणि इतर दोघांनी लग्नाच्या अमिषाने तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहायक समाजकल्याण आयुक्तांसह दोघांविरोधात रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजकल्याण सहायक आयुक्त योगेश सुधाकर पाटील यांच्यासह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी पिडीत तरुणीने रामानंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संबंधित तरुणीला त्यांच्या पत्नीने देखील मारहाण केली. त्यानंतर पाटील यांच्या वडिलांनी पिडीतेला घरातून हाकलून लावले असल्याचे पिडीतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.