धुळे : बहुजननामा ऑनलाईन – अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत अखिल भारतीय महिला मेळावा पारोळा येथे बालाजी महाविदयालयाच्या प्रागंणात झाला. यावेळी खा.ए.टी.पाटील यांनी सांगितले की, बडगुजर समाजातील महिलांनी असे समाजपयोगी उपक्रम राबविले पाहिजे. समाजाने एकसंघता निर्माण केली पाहिजे.
यावेळी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष उमेश करोडपती, कार्यक्रमाचे उद्घाटक खा. ए. टी.पाटील, प्रमुख पाहुणे आ.डॉ.सतिष पाटील, आ. चिमणराव पाटील, निवृत्त न्यायाधीश विकास गोंधळीकर, ॲड. अर्चना गोंधळीकर, ॲड.अर्चना पाटील, नगराध्यक्ष करण पवार, महिला समिती अध्यक्षा रत्ना बडगुजर उपस्थित होते.
मेळावाचे उद्घाटन खा.ए.टी.पाटील यांच्या हस्ते करण्यांत आले. प्रास्ताविकात रत्ना बडगुजर यांनी सांगितले की, समाजातील महिलांनी एकत्र येणे ही आज काळाजी गरज आहे.
खेडयापाड्यात समाजाची संख्या अल्प असुन समाजापर्यंत योजना अथवा मदत पोहचत नाही. महिलांनी अंधश्रध्देकडे न वळता डोळस पध्दतीने बघणे गरजेचे आहे. महिलांनी चुल व मुल एवढेच न पाहता सामजिक व राजकीय चळवळीत सहभागी व्हावे. समाजाचे अध्यक्ष उमेश करोडपती यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, समाजात आज देखील वर्षानुवर्षे चालत आलेली रुढी, परंपरा पहायला मिळत आहे. यात हुंडा पध्दती, महिलांना दुय्यम वागणुक, मुलींकडुन सरकारी नोकरीची इत्यादी अनेक प्रथा बंद केल्या पाहिजेत. महिलांनी समाजाचे प्रश्न राजकीय पातळीवर मांडले पाहिजे. यामुळे समाजाला एक राजकीय बळ प्राप्त होईल. असे ते म्हणाले. यावेळी निवृत्त न्यायाधीश ॲड.अर्चना गोंधळीकर यांनी कायदेविषयक व शासकीय योजनेची माहिती दिली. यावेळी बडगुजर समाज मोबाईल ॲपचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यांत आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र बडगुजर,भगवान बडगुजर, आनंदाभाऊ बडगुजर, मोहन बडगुजर, सुधीर बडगुजर, हिरालाल बडगुजर, सुभाष बडगुजर, योगेश बडगुजर, भावना बडगुजर,ज्योती बडगुजर, लता बडगुजर, मुंनदा बडगुजर, हर्षदा बडगुजर, स्नेहल बडगुजर,जयश्री बङगुजर, विजयाताई महाले, देवयानी बडगुजर यांनी प्रयत्न केले. महिला मेळावाचे सुत्रसंचालन स्वाती बङगुजर व रेवती बडगुजर यांनी केले.