बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडची बोल्ड अँड ब्यूटिफुल अॅक्ट्रेस सनी लिओनी (Sunny Leone) गेल्या काही दिवसांपासून आपल्या हॉटनेसमुळं चर्चेत येताना दिसत आहे. हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याचा जणू तिनं सपाटाचं लावला होता. खास बात अशी की, सनीनं फक्त फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेच तो व्हायरल होताना दिसत असतो. यावेळीही सनी चर्चेत आली आहे. परंतु यावेळी तिच्या चर्चेचा विषय हा हॉटनेस नाही तर काही औरच आहे.
सनीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात सनीचा हटके मास्क दिसत आहे. आपला मेकअप खराब होऊ नये यासाठी तिनं हा मास्क तयार करून घेतल्याचं दिसत आहे. सध्या हा मास्क चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरताना दिसत आहे.
सनीनं शेअर केलेला हा फोटो तिच्या सेटवरील आहे. या फोटोत तिनं पारदर्शक मास्क घातल्याचं दिसत आहे. यात तिचा चेहराही बऱ्यापैकी कव्हर होताना दिसत आहे. तिनं केलेला मेकअपही चाहत्यांना नीट दिसत आहे.
सनीनं या फोटोला खास कॅप्शनही दिलं आहे. सनी कॅप्शनमध्ये म्हणते की, शॉट्स दरम्यान मेकअप खराब न करताही सुरक्षित राहता येते.
सध्या सनीचा हा फोटो सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे. चाहत्यांनाही सनीचा मास्क खूप आवडला आहे.
सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती हॉरर कॉमेडी सिनेमा कोका कोला, रंगीला, वीरमादेवी आणि हेलेन अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय ती एमएक्स प्लेअरवरील बुलेट्स (Bullets) या वेब सीरिजमध्येही काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेबसीरिज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती.