अमृतसर : वृत्तसंस्था – आजची पिढी सोशल मीडियाच्या खूप आहारी गेली आहे. त्याचे फायदेही तितके असले तरी परंतु काहीवेळा मुले त्याचा गैरवापर करतात. असाच एक प्रकार अमृतसरमध्ये उघडकीस आला आहे. अमृतसरमधील एक अल्पवयीन मुलगी मोबाईलवर सोशल साइटवर गप्पा मारताना एका बाबाच्या संपर्कात आली. बाबांनी तिला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुररू केला. वाचन -अभ्यास करणे सर्व व्यर्थ आहे. जग काहीच नाही, बाबा सर्वकाही आहे. बाबाला शरण जावा, तुझे आयुष्य सुधारेल. अशा गोष्टी सांगून बाबांनी त्या मुलीला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढले. ज्यामुळे ती मुलगी त्या दिशेने चालू लागली.
सध्या मुलीवर मानसिक उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून तिची मुलगी दिल्लीच्या आसपासच्या भागातील एका बाबांच्या अनुयायांशी सोशल माध्यमातून संपर्कात होती. गेल्या आठवड्यात तिने आपले सामान पॅकिंग करुन अॅक्टिव्हावरुन तिचे घर सोडले. त्यांनी तिला शहरभर शोधले व संध्याकाळी ती भेटल्यावर तिला घरी आणले. घर सोडण्यामागचे कारण विचारले असता ती म्हणाली की, तिला काहीही आवडत नाही. तिला बाबांच्या आश्रयाला जायचे आहे. लोकांची सेवा करू इच्छिते. मुलीचे बोलणे ऐकून पालकांना आश्चर्याचा धक्काच बसला. बाबांसंदर्भात तिला विचारले असता तिने सांगितले की, त्याचे अनुयायी तिच्याशी गप्पा मारत आहेत. बाबांकडे बरीच शक्ती आहे. ते म्हणतात की कुटूंबाला सोडून दे, कारण तुमचे कोणीच नाही.
बाबांनी मुलीला अश्लील व्हिडिओ पाठविला :
जेव्हा मुलीच्या आईने तिच्या मुलीचा मोबाइल तपासला तेव्हा बाबांचे अनुयायी तिच्याशी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर सतत संपर्क साधत होते. हा गट एकापेक्षा जास्त व्यक्तींशी अवैध संबंध ठेवण्यास प्रवृत्त झाला होता. तिला काही अश्लील व्हिडिओही पाठविण्यात आले होते. जेव्हा त्यांनी बाबांबद्दल इंटरनेट शोधले तेव्हा ते दिल्लीच्या आसपासच्या भागातील आहेत आणि किशोरवयीन मुली इतर अनुयायी स्त्रियांना त्याचे अनुयायी फसवत आहेत. मुलगी बाबांचे व्हिडिओ पहात होती. तिला याबाबत समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर, तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली. दरम्यान, मुलीवर सध्या उपचार सुरु असल्याने ती बरी झाल्यानंतर कुटुंब संबंधित बाबांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असून न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरजोतसिंग मक्कड म्हणतात की, हे तथाकथित बाबा आणि त्यांचे अनुयायी मुलांना आमिष दाखवतात. ही अल्पवयीन मुलगी बाबांकडे जाण्याची आतुर आहे. तिला तिचे आई- वडील सर्वकाही खोटे वाटत आहेत. अल्पवयीन मुलीचा ब्रेन वॉश केला आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून ती बरी होण्यास बराच वेळ लागणार असल्याचेही त्यांनी संगितले.
Visit : bahujannama.com