बहुजननामा ऑनलाईन टीम : बँकेतील बचत खातेदारांची महत्त्वाची बातमी असून १५ डिसेंबरनंतर बचत खाते आणि एटीएम सेवेसाठी बँकेकडून जादा पैसे आकारले जाणार आहे. तसेच ICICI बँकही १५ डिसेंबरपासून बचत खात्याच्या काही नियमांमध्ये बदल करणार आहे. या नियमांसंदर्भात माहिती नसल्यास तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. याआधी ICICI बँकेच्या बचत खात्यात पैसे भरणं, आणि पैसे काढण्यासाठी आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते.तसेच एटीएममधून केल्या जाणाऱ्या ट्रान्झाक्शनवरही किरकोळ दंड आकारण्यात येत होता. मात्र आता बँकेने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेचे नियम बदलण्यात आले असून आता कोणत्याही ट्रान्सक्शनवर चार्ज लावण्यात येणार आहे.
कॅश ट्रान्झाक्शनसंदर्भात :
१) ग्राहक होम ब्रांचमधून आपल्या खात्यातून २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतो किंवा भरू शकतात. मात्र २ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास प्रत्येकी १००० रुपयांमागे ५ रुपये असे मिनिमम शुल्क आकारण्यात येणार आहे.
२) होम ब्रांच नसल्यास तुमच्या खात्यातून तुम्ही २५ हजार रुपयांपर्यंत ट्रान्झाक्शन करू शकता. २५ हजार रुपयांपर्यंत केलेले कोणतेही व्यवहार हे विनाशुल्क असतील मात्र त्यानंतर हजार रुपयांमागे ५ रुपये आणि मिनिमम शुल्क १५०असे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.
३) बचत खात्यात आपण महिन्यातून ४ वेळा पैसे भरू शकतो अथवा काढू शकतो. त्यानंतर पाचव्या ट्रान्सक्शनवेळी तुम्हाला १५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.
थर्ड पार्टी कॅश ट्रान्झाक्शन-
थर्ड पार्टी कॅश ट्रान्झाक्शनसाठी दररोज तुम्ही २५ हजार रुपयांपर्यंत देवाण-घेवाण करू शकता. मात्र त्यावर १५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. थर्ड पार्टी कॅश ट्रान्झाक्शनसाठी २५ हजारांपेक्षा अधिक व्यवहाराला बँकेकडून परवानगी देण्यात येणार नाही.
ATM व्यवहारांसाठीही बदलणार शुल्क :
ICICI बँकेने एटीएममधील व्यवहारांवरही निर्बंध लादले असून ICICI बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एका महिन्यात ५ ट्रान्झाक्शन विनाशुल्क असतील. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला २० रुपये आकारण्यात येणार आहेत.
Visit : bahujannama.com