लखनऊ : वृत्तसंस्था – समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोकसभा निवडणूकीत प्रचारादरम्यान भाजपच्या उमेदवार जया प्रदा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकऱणी त्यांच्याविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. शाहबाद येथे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची आजम खान यांच्या प्रचारासाठी १४ एप्रिल रोजी सभा झाली होती. त्या सभेत आजम खआन यांनी जया प्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं.
काय म्हणाले होते आजम खान
जिसको हम ऊंगली पकड़कर रामपुर लाए, आपने 10 साल जिससे अपने इलाके का प्रतिनिधित्व कराया…उसकी असलियत समझने में आपको 17 बरस लगे, मैं 17 दिन में पहचान गया कि इनके..
जया प्रदा या समाजवादी पक्षाकडून दोन वेळा खासदार झाल्या होत्या. २००४ आणि २००९ मध्ये रामपूर येथून त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१० मध्ये पक्षविरोधी हालचालींमुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते.
आजम खान यांनी केलेल्या विधानानंतर भाजपने त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. याला खालच्या पातळीवरील राजकारण म्हणत समाजवादी पक्षाचा हा खरा चेहरा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर देशभरात या वक्तव्यावरून देशभरात टीकेची झोड उठली होती. त्यानंतर महिला आयोगानेही आजम खान यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनानेदेखील याची दखल घेत शाहबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी न्यायालयाने आजम खान यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.