नव्वी दिल्ली : वृत्तसंथा – रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद प्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षांना उध्वस्त करण्यात आलेल्या विवादीत रचनेवर असलेल्या सिंह, पक्षी आणि फुलांच्या चित्रावरून प्रश्न विचारण्यात आले. मशीदीतही अशा प्रकारचे चित्र आढळतात का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
मुस्लिम पक्षाने सांगितले की, “कोणत्याही मशिदीत देवाचा कोणताही फोटो आढळून येत नाही. परंतु फक्त याच आधारावर हे नाही म्हटलं जाऊ शकत की हे स्थळ कुराणला धरून नाही आणि इस्लामिक तत्त्वांच्या विरुद्ध आहे.”
त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाला सागंतिले की, “सिंह द्वारावर सिंह किंवा पक्षांचे चित्र आणि कसौटी स्तंभांवर फुलांचे चित्र आढळून आल्याने हिंदू पक्षाला हे सिद्ध करण्यासाठी मदत मिळत नाही की, ही मिशिद नसून मंदिर आहे.” घटनापीठाने म्हटले की, “हे (दोन सिंह आणि एका पक्षाचा 1950 मध्ये मिळालेला फोटो) सिंह द्वारावर आहे. यात दोन सिंह आणि एक गरूड आहे.” त्यांनी असंही म्हटलं की त्यांना चांगले फोटो पाहायचे आहेत. घटनापीठाने म्हटले की, “एखाद्या मिशिदीत फूल किंवा जनावरांचे फोटो नाही मिळू शकत. श्री धवन तुम्ही एक संक्षिप्त नोट बनवू शकता का आणि आम्हाला मशिदीचे फोटो देऊ शकता का ?”
सुन्नी वक्फ बोर्ड आणि वास्तविक वादी एम सिद्दीक सहित इतरांच्या बाजूने आठव्या दिवशी बाजून मांडणारे राजीव धवन म्हणाले, “हिंदूंना पक्षांच्या या फोटोवर विश्वास असल्याने काहीही सिद्ध होत नाही.”
visit : bahujannama.com
- ‘या’ १० सौदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा