बहुजननामा ऑनलाइन : ATM वापरणे सध्या सगळ्यांच्या सोयीचे आहे, आपल्या कडे कॅश ठेवण्यापेक्षा , हव्या त्या वेळी ATM मधून पैसे काढून आपण आपले पैसे सुरक्षित ठेवू शकतो. त्यामुळे ATM चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु त्याचबरोबर ATM घोटाळ्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे ATM कार्ड चा योग्य वापर करणे आणि ट्रॅन्जेक्शन करतेवेळी सुरक्षितता जपणे महत्वाचे आहे.असे, न केल्यास आपले बँक अकाउंट रिकामे होण्याचे चान्सेस जास्त असतात. आपण पैसे काढताना ज्या ATM मधून पैसे काढत आहोत, ते सुरक्षित आहे का नाही, याची दखल घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. यामध्ये सगळ्यात जास्त धोका असतो तो ‘कार्ड क्लोनिंग’ वेळी , कार्ड क्लोनिंग म्हणजे आपली संपूर्ण माहिती चोरून दुसरे कार्ड बनविणे. त्यामळे सुरक्षितता बाळगण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ते जाणून घेऊया.
* कोणत्याही यूजर्स चा डेटा ATM मशीन च्या स्लॉट द्वारे हॅकर मिळवू शकतो. ते ATM मशीन च्या कार्ड स्लॉट मध्ये असं डिवाइस लावतात जेणे करून आपल्या कार्ड पूर्ण माहिती स्कॅन होते. त्यानंतर कोणत्याही वायरलेस डिवाइसद्वारे ते आपली माहिती चोरू शकतात. परंतु आपल्या कार्ड च्या संपूर्ण एक्सेस साठी हॅकर ला आपला पिन नंबर माहिती असणे गरजेचं असते, तो पिन नंबर हॅकर कोणत्याही छुप्या कॅमेऱ्याने मिळवू शकतो, त्यामुळे आपण ATM वापरताना लक्षात ठेवले पाहिजे कि, एका हाताने पिन नंबर एन्टर करताना त्याला दुसऱ्या हाताने झाकणे , गरजेचे आहे, जेणेकरून तो कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये तो पिन नंबर कैद होणार नाही.
* जेव्हा तुम्ही ATM मशीन वापरलं तेव्हा त्या मशीन च्या स्लॉट निरखून पाहणे गरजेचे आहे, जर त्यात काही गडबड असेल किंवा स्लॉट ढिला असेल तर ATM चा वापर टाळावा.
*ATM मशीन मध्ये कार्ड टाकताना त्यातून हिरव्या रंगाचा प्रकाश पडतो का , हे माहिती करणे गरजेचे आहे , जर लाल किंवा कोणताच रंग दिसत नसेल तर समजून जायचे कि, काही तरी गडबड आहे.
*जर आपल्याला हॅकिंग झाल्याची कल्पना आली , तर लगेच बँकेशी किंवा पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच जवळपास कोणते ब्लूटूथ कनेक्शन आहे का याची देखील माहिती घ्यावी.