मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बिहारमध्ये एका १६ वर्षांच्या मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींमध्ये आयटीबीपीचा एक जवान देखील आहे. घटनेनंतर आरोपींनी मुलीला झाड-झुडपात सोडले व ते तिथून निघून गेले. पीडित मुलगी हि ८वी मध्ये शिकण्यास असून घटनेनंतर तिला छपरामधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिला पटनामधील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
ही घटना दुपारी घडलेली आहे. घटना घडल्यानंतर पीडित मुलगी जखमी अवस्थेत घरी आल्यानंतर नातेवाईकांनी तिला तात्काळ उपचारासाठी दाखल केले. आरोपी पीडितेच्या गावातीलच रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. बलात्कार केल्यानंतर मुलीच्या प्रायव्हेट भागात रॉड घुसवल्याची अफवा देखील पसरली होती.
मात्र मुलीच्या वडिलांनी हे खोटे असल्याचे सांगितले. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेतून घरी येत असताना तिला जबरदस्ती उचलून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. ते म्हणाले की, आरोपी जवानाचा स्थानिक नेत्याशी संबंध आहे, म्हणून पोलिस हे प्रकरण मागे घेण्यास दबाव आणत आहेत. पोलीस अधीक्षक हरकिशोर राय यांनी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती दिली आहे. आयटीबीपी मधील जवानाची देखील तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.