भोकर तालुका भाजपमय होणार का?
भोकर : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्र भर ओळख असलेला मतदार संघ म्हणून भोकर विधानसभा ची ओळख संपूर्ण राज्यभर आहे अशोक चव्हाण यांनी आमदार की ह्याच मतदार संघातून लढवली व जिंकून सुद्धा काँग्रेसपक्षाचे मुख्यमंत्री पद त्यांनी मिळवले होते त्यानंतर त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण आता ह्याच मतदार संघात निवणूक लढवली व भरगच्च मताने जिंकून गेले आता या मतदार संघात मतविभागणी व्हावी मोदी सरकार करत असलेली कामे जनते पर्यंत पोहचावी या साठी नांदेड जिल्ह्यातील बडे नेते म्हणून ओळख असलेले मोटार सायकल रॅली काढून प्रचार करताना आज रोजी दिसत होते. पण भोकर तालुका भाजप मय होणार का? अशी चर्चा नागरिकांतून सुरू आहे. भोकर शहर भाजपच्या वतीने आज आ.राम पाटील रातोळीकर यांच्या नेतृत्वाखाली विजय संकल्प रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. लोकसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केलेले हे शक्ती प्रदर्शन एक प्रकारचा प्रचाराचाच भाग होता. आ.राम पाटील रातोळीकर यांनी विश्राम गृह येथून मुख्य चौकातील भागात थांबून या विजय संकल्प रॅलीस सुरवात झाली.रेस्ट हाऊस(विश्राम गृह) येथून रॅली ला सुरुवात झाली.
आमदार राम पाटील रातोळीकर यावेळी म्हणाले की,मला त्याच्यातून एक आनंद वाटला की लोकांनी या रॅली उस्फुर्त स्वागत केलं, मोदी मोदी च्या घोषणा करून मिरवणूक शहर भरातून ग्रामीण भागात नेले. रस्त्याने नागरिकांना अभिवादन करत असताना लोकांनी माझ्या अभिवादनाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दलची प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये असलेला आदरयुक्त भाव हा दृष्टिक्षेपात पडत होता. विजय संकल्प यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने संपूर्ण भारतभर आज एकाच वेळेस झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशास व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यास आज विकासाच्या शिखरावार नेले आहे. यासाठी राबवलेल्या योजना, घेतलेले धाडसी निर्णय, केलेले विकासाची कामे जनते पर्यंत पोहचाव्यात यासाठी ही जनसंपर्कासाठी व देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच व्हावेत यासाठी ही विजय संकल्प रॅली केली आहे. भोकर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, जुने-नवे कार्यकर्ते, नगरसेवक आज यात सहभागी झाल्याने रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला.दुचाकीला बांधलेले व हातात घेतलेले भाजपाचे भाजपचे झेंड्यांमुळे सर्वत्र भगवे वातावरण निर्माण झाले होते.
भारतीय जनता पार्टीने आज विजय संकल्प रॅली केली आहे.पण आमदार लवकरच नांदेड कडे रवाना झाले त्या नंतर गणेश कापसे यांनी संपूर्ण तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात स्वतः कार्यकर्ते सह जाऊन भाजपची कामगिरी सांगितली. भोकर शहरात रॅलीचे नेतृत्व या बड्या नेत्याने केले आ.राम पाटील रातोळीकर,डॉ.माधवराव किन्हाळकर(माजी मंत्री),नागनाथ घिसेवाड यांनी पुढाकार घेतला. यावेळी सुमारे १००० भाजपाचे कार्यकर्ते ,माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर,जेष्ठ ओबीसी नेते नागनाथराव घिसेवाड , बाळा साखलकर,प्रकाश कोंडलवार,गणेश कापसे,राजकुमार अंगरवार,संतोष मारकवार,गणपत पिट्टेवाड ,गंगाप्रसाद गज्जलवार,शेख अर्षद त्याच बरोबर भाजपचे सर्व नगरसेवक या विजय संकल्प रॅलीत सहभागी झाले होते.
काँग्रेसची गोची करण्यासाठी महिला पदाधिकारी रॅली चे केले आयोजन
नायगाव विधानसभा काँग्रेस च्या ताब्यात असल्याने त्या ठिकाणी सुद्धा प्रचार साठी चांगलाच जोर लावावा लागणार आहे त्यामुळे नरसी (नायगाव) येथे नांदेड जिल्हा परिषद सदस्य डॉ.मिनालताई खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली तर धर्माबाद येथे सौ.पूनम राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली विजय संकल्प रॅली काढण्यात आली यावेळी प्रत्येक भागात अनेक भाजपा कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होते.