तामिळनाडू : वृत्तसंस्था – Army Helicopter Crash | तामिळनाडुमध्ये (Tamil Nadu) एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. तामिळनाडूमध्ये लष्कराचे (Army) हेलिकॉप्टर कोसळले (Army Helicopter Crash) आहे. यामध्ये लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भारताचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत (Bipin Rawat) हेही या हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे.
#WATCH | Latest visuals from the spot (between Coimbatore and Sulur) where a military chopper crashed in Tamil Nadu. CDS Gen Bipin Rawat, his staff and some family members were in the chopper.
(Video Source: Locals involved in search and rescue operation) pic.twitter.com/YkBVlzsk1J
— ANI (@ANI) December 8, 2021
प्राथमिक माहितीनुसार, कुन्नूरच्या घनदाट जंगल परिसरात अग्निशमन दलाच्या जागेवर हेलिकॉप्टर कोसळले (Army Helicopter Crash) आहे. हेलिकॉप्टरमध्ये 3 उच्च अधिकाऱ्यांसह 4 जण होते. 3 गंभीर जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. आपत्कालीन दल घटनास्थळी आहे. सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) त्यांचे कर्मचारी आणि काही कुटुंबातील सदस्य तामिळनाडूमधील कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान कोसळलेल्या IAF Mi-17V5 helicopter वर होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Latest visuals from the spot (between Coimbatore and Sulur) where a military chopper crashed in Tamil Nadu. CDS Bipin Rawat, his staff and some family members were in the chopper.
(Pics Source: Locals involved in search and rescue operation) pic.twitter.com/miALr88sm1
— ANI (@ANI) December 8, 2021
दरम्यान, हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
तर, यामध्ये जिवितहानीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
परंतु, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत (Bipin Rawat) हे हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये होते अशी माहिती समोर येत आहे.
या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी तसेच इतर 9 जण असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, हेलिकॉप्टर अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एका राष्ट्रीय हिंदी न्यूज चॅनलने दिलं आहे.
An IAF Mi-17V5 helicopter, with CDS Gen Bipin Rawat on board, met with an accident today near Coonoor, Tamil Nadu.
An Inquiry has been ordered to ascertain the cause of the accident.— Indian Air Force (@IAF_MCC) December 8, 2021
Web Title :- Army Helicopter Crash | army-helicopter-crash-An IAF Mi-17V5 helicopter, with CDS Gen Bipin Rawat on board, met with an accident today near Coonoor, Tamil Nadu. An Inquiry has been ordered to ascertain the cause of the accident.
Rajesh Kale Solapur |’त्या’ प्रकरणात सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे 2 वर्षांसाठी तडीपार