तामीळनाडू : वृत्तसंस्था – Army Helicopter Crash |भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर (Army Helicopter Crash) कोसळले आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) हेलिकॉप्टरमध्ये होते. ज्यावेळी हेलिकॉप्टर कोसळले (Army Helicopter Crash) त्यावेळी बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि 9 लोक प्रवास करत होते. या घटनेत 3 लोक गंभीर जखमी झाले असून 4 जणांचे मृतदेह (Deadbody) आढळून आले आहेत. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे.
#WATCH | Latest visuals from the spot (between Coimbatore and Sulur) where a military chopper crashed in Tamil Nadu. CDS Gen Bipin Rawat, his staff and some family members were in the chopper.
(Video Source: Locals involved in search and rescue operation) pic.twitter.com/YkBVlzsk1J
— ANI (@ANI) December 8, 2021
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलगिरी पर्वत रागांमध्ये आज दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली (Army Helicopter Crash) आहे. इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहीत माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे (MoS Subhash Bhamre) यांनी दिली आहे. या घटनेत 3 गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Four bodies recovered, three injured persons rescued from IAF helicopter crash site in TN: Official sources
— Press Trust of India (@PTI_News) December 8, 2021
बिपीन रावत हे आपल्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्यासमवेत वेलिंग्टन मध्ये एका कार्यक्रमासाठी जात होते. वेलिंग्टन मध्ये आर्मी सेंटर येथे ही घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह जवळपास 9 जण होते. हवाई दलाचे Mi-17V5 हेलिकॉप्टर होते.
Military chopper crashes in Tamil Nadu. Senior officials were on board. More details awaited. pic.twitter.com/j3jXy66q6k
— ANI (@ANI) December 8, 2021
Web Title :- Army Helicopter Crash | Four bodies recovered, three injured persons rescued from IAF helicopter crash site in TN CDS Gen Bipin Rawat IAF Mi-17V5 helicopter.