नवी दिल्ली : वृत्तसंस्था- 71व्या प्रजासत्ताकदिनी नेहमीप्रमाणे लष्कराच्या तुकड्यांनी परेडमध्ये भाग घेतला. परंतु, 26 वर्षांच्या महिला आर्मी ऑफिसरच्या उपस्थितीने ही परेड आणखी खास झाली होती. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आपल्या कुटुंबाच्या चौथ्या पीढीतील आर्मी ऑफिसर तान्या शेरगीलने भाग घेतला होता. सोशल मीडियावर आता तान्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
तान्या परेडमध्ये सैन्याच्या पुरूष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला ऑफिसर आहे. आर्मीच्या कॉर्प्स ऑफ सिग्नलची कॅप्टन तान्या शेरगील पंजाबच्या होशियारपुरमधील आहे आणि सैन्याच्या सिग्नल कोअरमध्ये कॅप्टन आहे. कॅप्टन शेरगीलला चौथ्या पीढीची ऑफिसर म्हटले जाते कारण तिच्या कुटुंबातील तीन सदस्यांनी यापूर्वी सैन्यात राहून देशाची सेवा केली आहे. तान्याचे पणजोबा, आजोबा आणि वडीलसुद्धा आर्मीत होते. तान्या म्हणाली, मी यापूर्वी अशा समारंभात कधी भाग घेतला नव्हता. परंतु, लहानपणापासून माझी इच्छा होती की एक दिवस परेडमध्ये सहभागी व्हायचे.
सैन्यामध्ये महिलांचा आदर्श असल्याबाबत म्हटले असता, तान्या म्हणाली, अशा अनेक महिला आहेत, ज्या माझ्यापेक्षा कितीतरी चांगले काम करत आहेत. मी अशा अनेक महिलांना माझा प्रेरणास्त्रोत मानते. तान्या पुढे म्हणाली, एखाद्या लहान मुलीकडून जरी मला प्रेरणा घ्यावी लागली तरी माझ्यासाठी ती मोठी गोष्ट आहे. सैन्यात भरती होण्यापूर्वी तान्याने नागपुर यूनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्युनिकेशनमध्ये बीटेक केले आहे. मुलाखतीमध्ये तान्याने सांगितले की ती मेरीटवर सैन्यात सहभागी झाली आहे. तिचा पुढचा प्लान माउंटेनियरिंगचा कोर्स करण्याचा आहे आणि प्रमोशन एग्झामची तयारी करण्याचा आहे.
Visit : bahujannama.com