नवी दिल्ली : वृत्तसंस्था- अॅप्पलने बुधवारी आयफोन 11ची सीरीज लाँच केली. या फोनची सुरुवातीची किंमत भारतात 64900 इतकी ठेवण्यात आली आहे. ही सीरीज लाँच केल्यानंतर अॅप्पलने जुन्या आयफोनची किंमत कमी केली आहे. कंपनीने आयफोन 7 पासून तर आयफोन XS पर्यंतच्या फोनच्या किंमतीत 10 ते 30 टक्क्यांनी घट केली आहे. आता ग्राहकाना आयफोन 20000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळणार आहे.
वनप्लसला टक्कर देण्यासाठी उचलले पाऊल
एका इंग्रजी वृत्तानुसार, अॅप्पलने भारतीय बाजारात आपली किंमत टिकवून ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आणि चीनी कंपनी वनप्लस आयफोनला टक्कर देत आहे. दोघांशी स्पर्धा करण्यासाठी अॅप्पलने जुन्या आयफोनची किंमत कमी केली आहे. आयफोन 7s चं 32 GB व्हर्जन 10000 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे त्याची किंमत आता 30000 रुपये झाली आहे. अॅप्पल चीनसहीत भारत आणि इतर अनेक देशात अवघड परिस्थितीतून जात आहे. एका रिपोर्टनुसार, आयफोनचा सेल 2017 मध्ये 32 लाख होता. 2018 मध्ये यात घट होऊन हा सेल 17 लाख युनिट्स झाला होता.
अॅप्पलसाठी मोठी बाजारपेठ भारत
कंपनीला विक्रीचा आकडा पुन्हा वाढवायचा आहे. वार्षिक 200 कोटींचा टर्न ओव्हर देणारी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनीही यावर अनेकदा जोर दिला आहे. याशिवाय अमेरिकेच्या तुलनेत भारतात कंपनीने आपलं मार्जिन कमी ठेवलं आहे यावरून ही गोष्ट स्पष्ट होते.
कोणता आयफोन किती रुपयांनी स्वस्त झाला ?
मॉडेल जुनी किंमत नवीन किंमत
आईफोन XS 64जीबी 99,900 रुपए 89,900 रुपए
आईफोन XS 256जीबी 1,14,900 रुपए 1,03,900 रुपए
आईफोन XR 64जीबी 59,900 रुपए 49,900 रुपए
आईफोन XR 128जीबी 64,900 रुपए 54,900 रुपए
आईफोन 8 प्लस 64जीबी 69,900 रुपए 49,900 रुपए
आईफोन 8 64जीबी 59,900 रुपए 39,900 रुपए
आईफोन 7 प्लस 32जीबी 49,900 रुपए 37,900 रुपए
आईफोन 7 प्लस 128जीबी 59,900 रुपए 42,900 रुपए
आईफोन 7 32जीबी 39,900 रुपए 29,900 रुपए
आईफोन 7 128जीबी 49,900 रुपए 34,900 रुपए