नवी दिल्ली : वृत्तसंस्था- अॅप्पल इव्हेंटसाठी काऊंट डाऊन सुरू झालं आहे. आज 10 सप्टेंबर रोजी सैन जोसमधील मुख्य ऑफिसच्या स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये याचे आयोजन करणार आहे. असे पाहण्यात आले आहे की, अॅप्पल आपले आयफोन मंगळवारी लाँच करतं आणि प्रीऑर्डर शुक्रवारी सुरु करतं. याची डिलिव्हरी एका महिन्याने सुरु करतं. अशी अपेक्षा केली जात आहे की, कंपनी या इव्हेंटमध्ये iPhone 11, iPhone 11 Pro, आणि iPhone 11 Pro Max लाँच करणार आहे.
कसा पहाल इव्हेंट ?
कंपनीचा हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार, रात्री साडे दहा वाजता सुरू होणार आहे. यासाठी कंपनीच्या युट्युब पेजवर इंनव्हिटेशन पाठवण्यात आलं आहे. ही पहिलीच वेळ असणार आहे की, कंपनी हा इव्हेंट युट्युब पेजवर लाईव्ह प्रसारीत करणार आहे. याशिवाय कंपनीच्या साईटवरही व्हिडीओ पाहता येणार आहे. iPhone, iPad, iPod touch model (iOS 10 or above) किंवा Mac computerवर सफारी ब्राऊजरचा प्रयोग केला जाऊ शकतो.
लाँच होणार iPhone 11 सीरीज
या इव्हेंटमध्ये iPhone 11 सीरीजवर सर्वांचे लक्ष लागून आहे. यात A13 चिपसेट युज केला जाणार आहे. यामुळे याला स्पीड जास्त असणार आहे. याचा कॅमेराही अपग्रेडेड असणार आहे ज्यामुळे कमी प्रकाशातही तो चांगले फोटो क्लिक करता येतील. यात रिव्हर्स वायरलेस चार्जिंग असण्याचीही शक्यता आहे.
काय असेल किंमत ?
रिपोर्टनुसार, iPhone 11च्या बेस्ट व्हेरिएंटची किंमत जवळपास 749 डॉलर म्हणजेच भारतातील जवळपास 53800 रुपये इतकी असेल. भारतात अॅप्पलने iPhone XR चा सर्वात बेस व्हेरिएंट 77000 रुपयांमध्ये लाँच केला होता. iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max या फोनची किंमत 71700 आणि 78900 रुपये असू शकते. नेमकी किंमत जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल.