बहुजननामा ऑनलाइन – Anti-Corruption Bureau | रस्ता कॉंक्रीट कामाचे बिल (Bill) मंजुर करून देण्याच्या मोबदल्यात ठेकेदाराकडून 40 हजाराची लाच (Bribe) घेताना करगणी (Kargani) ग्रामपंचायतीच्या सरपंचाला (ता. आटपाडी, जि. सांगली) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) रंगेहाथ पकडले आहे. त्याच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात(Atpadi police station) गुन्हा दाखल केला आहे.
गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39, रा. करगणी, ता. आटपाडी ) असे अटक केेलेल्या सरपंचाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी करगणी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नवबौध्द समाजगल्ली शेटफळे रस्ता येथील रस्ता कॉंक्रीटचे काम घेतले होते.
सदर कामाचे बील मंजूर करून देण्याच्या मोबदलल्यात सरपंच खंदारे यांनी 4 टक्के रक्कम म्हणून 40 हजाराची लाच ठेकेदाराकडे मागितली होती.
त्यामुळे ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Bureau) तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने (ACB) ग्रामपंचायत करगणी येथे सापळा रचून 40 हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस उपायुक्त सुभाष नाडगौडा, पोलीस उपअधिक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले, तसेच कर्मचारी संजय कलकुटगी, अविनाश सागर, संजय संकपाळ, सलीम मकानदार, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.
web title: Anti-Corruption Bureau | Sarpanch ACB caught taking bribe of Rs 40,000; Crime at Atpadi police station