नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना महामारी (Coronavirus in India) सध्या नियंत्रणात दिसत आहे. मागील 24 तासात देशभरात 62 हजार 224 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या दरम्यान 1 लाख 7 हजार 628 संक्रमित बरे झाले. तर काल 2542 रूग्णांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे अॅक्टिव्ह केस, म्हणजे उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 48,090 ने कमी झाली आहे. हा आकडा 8 लाख 65 हजार 432 पर्यंत पोहचला आहे.
आरोग्य मंत्राल्या (Ministry of Health) कडून बुधवारी सकाळी जारी माहितीनुसार, देशात आतापर्यंत 2 कोटी 96 लाख 33 हजार 105 लोक कोरोनाने संक्रमित झाले आहेत. यापैकी 2 कोटी 83 लाख 88 हजार 100 लोक बरे झाले. आतापर्यंत 3 लाख 79 573 लोकांनी व्हायरसमुळे जीव गमावला आहे.
प्रमुख राज्यांची स्थिती :
महाराष्ट्र :
राज्यात मंगळवारी 7,652 लोक संक्रमित आढळले. 15,176 लोक बरे झाले आणि 1,458 लोकांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकुण 59.24 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. यातून 56.69 लाख लोक बरे झाले तर 1.14 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1.38 लाख रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिल्ली :
नवीन रूग्ण 228
मृत्यू 12
उत्तर प्रदेश :
नवीन रूग्ण 270
मृत्यू 56
अरुणाचल :
नवीन रूग्ण 366
मृत्यू 6
कृपया हे देखील वाचा:
Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा
राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक