लातूर : बहुजननामा ऑनलाईन – उदगीर येथील नगरपरिषदतर्फे नांदेड रोडवरील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खा. सुनील गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे तर यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, न. प. उपाध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड, माजी आ. प्रा. मनोहर पटवारी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, नगरसेवक ॲड. सावन पस्तापुरे, बापुराव यलमटे, ॲड. दत्ताजी पाटील, मनोज पुदाले, राजकुमार मुक्कावार, पप्पू गायकवाड, महेबूब शेख, उत्तरा कलबुर्गे, नंदकुमार नळंदवार, मनोहर भंडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.