बहुजननामा ऑनलाइन टीम – सुशांतसिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे सतत सुशांतच्या कुटुंबासमवेत उभी असते. तिने नेहमी म्हटले आहे की ती कुटुंबाच्या प्रत्येक दाव्याचे समर्थन करते आणि सुशांतला न्याय हवा आहे. पण यादरम्यान जेव्हा अंकितावरही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते, तेव्हा तिच्यावर आरोप होत होते, ते पाहता आता स्वत: अंकिताने पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आहे.
अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सुशांत प्रकरणावर सविस्तर भाष्य केले आहे. पोस्टमध्ये तिनं रिया चक्रवर्तीला लक्ष्य केलं आहे. अंकिता लिहिते, ‘मी कधीही असे म्हटले नाही की ही हत्या आहे आणि यासाठी कोणतीही व्यक्ती जबाबदार आहे. मी सुशांतला नेहमीच न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे आणि नेहमीच त्याच्या कुटुंबासमवेत उभी राहिले आहे.’
अंकिताने तिच्या विरोधात केलेल्या आरोपांचा उल्लेखही केला आहे. तिनं सांगितलं की तिला सवत, विधवा असं म्हटलं गेलं, परंतु ती काहीही बोलली नाही, तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
तिच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या मानसिक आरोग्याबद्दल तिला माहिती द्यायची होती म्हणूनच ती सुशांत प्रकरणात सक्रिय झाली. 2016 पर्यंत ती सुशांतसोबत होती, म्हणून तिला त्याच्याबरोबर घालवलेले आपले क्षण सांगायचे होते.
अंकिताने आक्षेप घेतला की सुशांत डिप्रेशनमध्ये होता असे रियाने बर्याच वेळा जाहीरपणे सांगितले आहे. पण तिच्या मते, एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असेल तर ती त्या व्यक्तीला कधीच औषधं दिली जात नाहीत.
अंकिता रिया बद्दल म्हणाली, एकीकडे ती डॉक्टरांना सुशांतला बरे करण्यास सांगत होती, तर दुसरीकडे ती ड्रग्जची व्यवस्था करत होती. जर तिचं सुशांतवर खूप प्रेम होतं मग त्याची तब्येत आधीच ठीक नव्हती तर त्याला अशी औषधं का दिली.
अंकितानेही रियावर सत्य लपवल्याचा आरोप केला आहे. तिच्या मते, रियाची वागणूक बेजबाबदार आहे. ती म्हणते, रिया सतत म्हणाली की सुशांतच्या उपचारांविषयी कुटुंबाला माहिती आहे पण सुशांत ड्रग्ज घेत असल्याचे तिनं कुटूंबाला कधी सांगितले का? तिने सांगितलं नाही कारण कदाचित ती देखील त्या ड्रग्जचा आनंद घेत होती.
या सर्व गोष्टींमुळे रियाची अटक अंकिताला तिच्या कर्माचं फळ आहे असं वाटतं. तिनं आवाहन केलं की या प्रकरणाशी संबंधित माहिती देणाऱ्या व्यक्तींनी जपून राहावं.