मुंबई बहुजननामा ऑनलाइन : दादरच्या कोहिनुर मिलच्या जमीन खरेदी – विक्रीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी ने चौकशीसाठी बोलावले आहे. त्यावेळी ते संपूर्ण कुटुंबासमवेत ईडीच्या कार्यालयात हजर झाल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. ‘ राज हे ईडीच्या चौकशीला निघालेत कि सत्यनारायणाच्या पूजेला ?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
दमानिया म्हणाल्या कि, “राज ठाकरे चौकशीला जातेवेळी एवढी नाटकी का करत आहेत. ते चौकशीला जात आहेत कि, सत्यनारायनाच्या पूजेला ? हे सगळे करून ते सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली तरी कोठून ? याविषयी विचारणा केली जात आहे. भाजपने इतर पक्षांच्या नेत्यांप्रमाणे आपल्या पक्षातील नेत्यांचीदेखील अशीच चौकशी करायला हवी. सामान्य माणसांप्रमाणे सर्वांची चौकशी करायला हवी. ”
दरम्यान, दादरच्या कोहिनुर मिल जमिनीच्या खरेदी – विक्री संदर्भात आज ईडीद्वारे राज ठाकरे यांची चौकशी सुरु आहे. यावेळी ते पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे या आपल्या सर्व कुटुंबासोबत ईडीच्या कार्यालयात उपस्थित आहेत.
राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा drama? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 22, 2019